HW Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमधील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (१३ एप्रिल) पहाटेपासून सुरु असलेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास भारतीय जवानांना यश आले आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सध्या या परिसराला घेराव घालण्यात आला असून येथे शोधमोहीम सुरु आहे. भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांकडून सुरु असलेल्या शोधमोहिमेत २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.यापूर्वी रविवारी (७ एप्रिल) सकाळी जम्मू-काश्मीरमधील त्राल परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांच्या जवानांकडून २ ते ३ दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते. तर शनिवारी (६ एप्रिल) शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. राहिल राशिद शेख आणि बिलाल अहमद अशी या दहशतवाद्यांची नावे होती

Related posts

निवडणूक आयोगाने ‘नमो टीव्ही’वर लावलेली बंदी हटवली

News Desk

आरएसएस आणणार कामसूत्र

News Desk

काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार कुमार केतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

News Desk