HW Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | गेल्या तीन दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास अखेर भारतीय सैन्याला यश आले आहे. सुरक्षा दलाला या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जवानांनी या संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरु केली. दिवसेंदिवस सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढतच आहेत. भारतीय सैन्याकडून मात्र पाकिस्तानला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

भारतीय सैन्याकडून मात्र पाकिस्तानला या कुरघोड्यांना वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, या चकमकीत ५ भारतीय जवान शहीद झाले असून ९ जवान जखमी झाले आहेत. या ९ जखमी जवानांपैकी २ जवान सीआरपीएफचे असून ७ जवान लष्कराचे आहेत. तसेच या चकमकीत सीआरपीएफचे २ तर जम्मू-काश्मीर पोलीस दलातील २ कर्मचारी शहीद झाले आहेत.पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर इतका आंतरराष्ट्रीय दबाव असताना देखील एकीकडे शांततेची भाषा करणारा पाकिस्तान दुसरीकडे सीमारेषेवर मात्र दर दिवशी कुरापती करत आहेत.

Related posts

काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा

Ramdas Pandewad

उत्तर प्रदेशात भारतीय वायू सेनेचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले

News Desk

पृथ्वीतलावरून मानवाच्या शेवटाची सुरुवात

News Desk