HW Marathi
देश / विदेश

मल्ल्याची प्रत्यार्पणविरोधी याचिका इंग्लंडच्या न्यायालयाने फेटाळली

लंडन | सरकारी बँकांना नऊ हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. माल्ल्याच्या भारतात आणण्याचा हालचालींना वेग आला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात विजय माल्ल्याने दाखल केलेली याचिका इंग्लंडच्या न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

 

त्यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मिळालेली मंजुरी हे भारतीय तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश असून, आता माल्ल्याच्या मुसक्या आवळून त्याला काही दिवसांतच भारतात आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 विजय माल्या याने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की,  सरकारी बँकांनी माझ्याकडून पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर त्यांनी दिली होती. जेट एअरवेज कंपनी आर्थिक अडचणीत असून कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी कर्जदात्यांकडून १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत मिळावी म्हणून नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनीता गोयल यांनी पद सोडले होते.

 

Related posts

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील चकमकीत १ दहशतवादी ठार

News Desk

‘मोदी सरकारच्या कार्यकाळात राममंदिर होणारच नाही’

News Desk

चीनला भारताच्या साखरेचा गोडवा

Shweta Khamkar