HW News Marathi
देश / विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना अतिदक्षता विभागातून हलवले

लंडन | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना २७ मार्चला कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर जॉनसन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. आता जॉनसन यांना अतिदक्षता विभागातून हलवले असून त्यांची प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे. मात्र, जॉनसन यांना डॉक्टरांच्या देखरेखीतमध्ये ठेवले आहे, ही माहिती त्यांच्या ऑफिसच्या वतीने पत्रकारांना देण्यात आली आहे.

जॉनसन यांना कोरोनाची लागण झाल्याची कळाल्यानंतर त्यांनी स्वतःला आयसोलेट केले होते. जॉनसन यांना लंडनमधील सेंट थॉमस रूग्णालयात दाखल करण्यात येत असून ब्रिटनचे विदेश मंत्री डोमिनिक राब यांनी तात्पुरत्या स्वरुपात ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

दरम्यान, जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या ६५,००० पार पोहोचली आहे. तर कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा ७,९७८ वर गेला आहे. आतापर्यंत ब्रिटनमध्ये फक्त १३५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भ्रष्ट दाभोलकरांच्या नावे शास्त्रज्ञाला पुरस्कार, विचित्र विरोधाभास | हिंदू जनजागृती समिती

Gauri Tilekar

पवारांनंतर खासदार संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट !

News Desk

कृषी कायद्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे शरद पवारांनी केले स्वागत

News Desk