तेहराण, इराण | इराणमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना ८ जानेवारीला समोर आली होती. मात्र हे विमान चुकून पाडल्याची कबुली इराणच्या लष्कराने दिली आहे. हे विमान मानवी चुक होती आणि या चुकीमुळे १७६ प्रवाशांना जीव गमवावा लागला. इराणच्या लष्काराने कबुली दिल्यानंतर आता या चर्चेला पुर्णविराम लागला आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. हवाई हल्ले करत, सैन्य दल उध्वस्त करत इराण-अमेरीका एकमेकांवर हल्ला-प्रतिहल्ला करत आहेत.
Iran state TV, citing military, says country 'unintentionally' shot down Ukrainian jetliner because of human error: The Associated Press pic.twitter.com/HhPUZemVgD
— ANI (@ANI) January 11, 2020
इराणच्या हल्ल्यातच युक्रेनचं विमान कोसळल्याचा दावा अमेरिका आणि कॅनडाने केला होता. आता इराणनेही चूक मान्य करत अनावधानाने युक्रेनचं विमान पाडल्याचं कबूल केलं आहे. या 176 प्रवाशांमध्ये इराणच्या 82, कॅनडाच्या 63, युक्रेनच्या 11 प्रवाशांचा आणि 11 क्रू मेंबर्सचा समावेश आहे.
या अपघाताची एक चित्रफित समाजमाध्यमांवर टाकण्यात आली होती, त्यात हाती आली होती यात थ्रुडू यांनी हे विमान पाडलं असल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर आणखी एक चित्रफित समोर आली त्यात तेहरानच्या हवाई सुरक्षा बॅटरीजच्या मदतीने हे विमान पाडण्यात आल्याचे दिसून आले होतं. पण कॅनडातील लोकांना या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, असंही ते म्हणाले.
थ्रुडू यांच्या आरोपाला पाश्चिमात्य नेत्यांनी पाठिंबा देत इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यातच ते विमान पडले याचे पुरावे आहेत पण त्यात त्यांचा हेतू विमान पाडण्याचा नसावा, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले होते. तर इराणची एक किंवा दोन क्षेपणास्त्रे विमानावर धडकली असावीत. त्यानंतर त्याचा स्फोट झाला, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.