HW News Marathi
देश / विदेश

डेरा सच्चा सौदा मुख्यालयात अवैध स्फोटके

बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात पोलिसांनी झाडाझडती केली असता अनेक धक्कादायक माहिती समोर आले आहे. आता आणखी एक स्फोटक माहिती समोर आली आहे. डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात अवैध स्फोटके आणि फटाक्यांचा कारखाना असल्याचे समोर आहे, या कारखान्यातील स्फोटके जप्त करून कारखान्याला टाळे ठोकले आहे.

बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या बाबा राम रहिमच्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाची निमलष्करी दल आणि हरयाणा पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. झाडाझडतीचा आजचा दुसरा दिवस आहे. काल दिवसभरात रोख रकमेसह अनेक महागड्या वस्तू या मुख्यालयात सापडल्या. आजच्या दुसऱ्या दिवशीही तपासणी सुरू आहे. मुख्यालयात स्फोटके आणि फटाक्यांचा कारखाना आढळून आला आहे. पोलिसांनी कारखान्याला टाळे ठोकले आहे. तसेच पोलिसांनी तीन अनुयायांना अटक केली आहे. ५ कोटी खर्च करून हिंसा भडकवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चमकौर सिंह, कर्मजीत आणि दानसिंह अशी त्यांची नावे आहेत. डेरा पंचकुला शाखेचा प्रमुख असलेला चमकौर सिंह हा मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे.डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात काल दिवसभरात झडती घेतल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच तपासणीला पुन्हा सुरुवात झाली. पंजाबमधून बोलावण्यात आलेल्या १४ लोहारांनी मुख्यालयातील कार्यालयांचे टाळे तोडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्यमंत्री झोपले आहेत का? – संभाजी ब्रिगेड

News Desk

दिल्लीत शरद पवारांच्या घरी राष्ट्रमंचच्या विरोधी पक्ष नेत्यांची बैठक सुरु

News Desk

नथुराम गोडसे प्रकरणी कमल हासन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

News Desk