नवी दिल्ली | गेले काही दिवस राजस्थानमध्ये राजकीय वातावरण अस्थिर होते. काल ( १४ जुलै) सचिन पायलट यांच्याकडून उपमुख्यमंत्री पद आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले. त्यानंतर काँग्रेस नेत्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांनी पक्षाबद्दल आणि २ महत्त्वाचे नेते पक्षातून गेल्याबद्दल हळहळ ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.
“पक्षातून आणखी एक मित्र गेला. ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट चांगले सहकारी आणि मित्र होते. दुर्दैवाने पक्षाने २ निष्ठावान युवा नेते गमावले आहे. माणसाने महत्त्वाकांक्षी असणे चुकीचे नाही. पक्षाच्या कठीण काळात त्यांनी कष्ट घेऊन काम केले आहे”, असे ट्विट प्रिया दत्त यांनी केले आहे.
दरम्यान, “काँग्रेस होती, आहे आणि राहील, असा विश्वास देखील प्रिया दत्त यांनी ट्विट मधून मांडला आहे. सध्या पक्षात जे काही घडत आहे त्यासाठी पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे” असेही त्यांनी म्हटले आहे.
Another friend leaves the party both sachin and jyotirajya were colleagues & good friends unfortunately our party has lost 2 stalwart young leaders with great potential. I don't believe being ambitious is wrong. They have worked hard through the most difficult times.
— Priya Dutt (@PriyaDutt_INC) July 14, 2020
तसेच, प्रिया दत्त यांनी आणखी एक ट्विट केले त्यात त्यांनी , “मी पक्षासाठी कायम संघर्ष केला. आणि कोणत्याही प्रकारच्या ब्लॅकमेलिंगच्या मी विरोधात आहे. इथे कुठेतरी चुकत आहे आणि ते शोधणे गरजेचे आहे”, असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.
I am one for discipline in the party and I have always fought for it. As I have seen a lot of indicipline being rewarded and forgotten aswell. I also am against blackmail of any sort. But Here something is going wrong and to nip it in the bud we must find out what it is
— Priya Dutt (@PriyaDutt_INC) July 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.