नवी दिल्ली | आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाची स्फॉट कॉपी असणार आहे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या या काळात काय काय गोष्टी लोकांना दिल्या त्या सविस्तरपणे सांगतल्या. मोदी सरकारने आत्मनिर्भर भारतला सुरुवात केली त्याचे फायदेही यावेळी त्यांनी सांगतिले.
२९ जानेवारी पासून सुरु झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कडून सकाळी ११ वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार आहे. कारण हा अर्थसंकल्प कोरोनामुळे मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारणारा ठरणारा का याकडे सामान्यांसह सर्व देशाचे लक्ष लागले आहे. या वर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला जात आहे.
निर्मला सीतारामण यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे –
पहिल्या डिजीटल जनगणनेची घोषणा
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली डिजीटल जनगणना करण्यात येणार आहे.
पुढची जनगणना ही डिजीटल असेल, स्वातंत्र्यानंतर पहिली डिजीटल जनगणना
डिसेंबरला पहिला मानवरहित उपग्रह सोडणार
त्यासाठी ६,०६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार
डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी १५०० कोटींची तरतूद
लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ बनवण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा
देशात जवळपास १०० नवीन सैन्य शाळा बनवल्या जातील
लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ बनवण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा
महिलांनी यानंतर नाईट शिफ्टमध्येसुद्धा काम करता येईल
Social security benefits will be extended to gig and platform workers. Minimum wages will apply to all categories of workers. Women will be allowed to work in all categories and also in night shifts with adequate protection: FM Nirmala Sithraman. #Budget2021 pic.twitter.com/ezbwH58wa7
— ANI (@ANI) February 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.