मुंबई | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखांच्या वर पोहोचला आहे. तर ३००० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारताने कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगभरात कौतुक होत आहे. तसेच कोरोनाच्या लढाईत भारताने जगालाही मदत केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद भूषवतात.
Union Health Minister Dr Harsh Vardhan is set to take charge as the chairman of the World Health Organization Executive Board. Executive Board meeting of the WHO will be held on 22nd May where India would be elected to the board. (file pic) pic.twitter.com/JuUA5wovG2
— ANI (@ANI) May 19, 2020
डॉ. हर्षवर्धन हे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्याकडून २२ मे पासून ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी (१९ मे) एकमत झाले आहे. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. तसेच तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारताची नियुक्ती केली जाईल, असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहाने सर्वांच्या संमतीने घेतला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.