HW News Marathi
Covid-19

केंद्रातले ‘हे’मंत्री आजपर्यंत कोरोनाच्या विळख्यात अडकले ! पाहा यादी…

नवी दिल्ली | देशात कोरोनाचे संकट हळूहळू कमी होताना दिसत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार जारी केलेल्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सुट देत आहेत. सुरुवातीला सामान्य नागरिकांनाच कोरोनाने आपल्या जाळ्यात अडकवले होते. मात्र, हळूहळू कोरोनाच्या या विळख्यात राजकीय नेतेही येण्यास सुरुवात झाली. राज्य सरकारच्या अखत्यारीतील काही नेत्यांना, आमदारांना कोरोना झाला. त्यातुन काही जण सुखरुप बरे झाले. तर काही जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे केंद्रातही कोरोनाचा विळखा घट्ट होण्यास सुरुवात झाली. अनेक केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

केंद्रिय मंत्री ज्यांना कोरोनाची लागण झाली –

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी,

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान,

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल,

केंद्रीय जल संसाधन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत,

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक,

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी,

केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी,

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल,

केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले,

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी

नक्कीच केंद्रातील हे सर्व मंत्री कोरोनामुक्त होतील. काही मंत्री कोरोनामुक्त होत काम करण्यास रुजू देखील झाले आहेत. तर काही जण अद्याप रिकव्हर होत आहेत. लवकरच कोरोना कायमचा संपावर, कोरोनावरील लस यावी या प्रतिक्षेत प्रत्येक नागरिक आहेच.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात उद्यापासून लॉकडाऊन नाही, मात्र, या दोन दिवशी असू शकेल लॉकडाऊन

News Desk

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ४४ लाखांहून अधिक, तर अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग

News Desk

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच !

News Desk