नवी दिल्ली | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी जीवाची पर्वा न करता दिवसरात्र एक करून काम करत आहेत. तर देशातील काही ठिकाणी डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार असून यासाठी मोदी सरकार अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. यासंदर्भात जावेडकरांनी आज (२२ एप्रिल) पत्रकार परिषदेद्वार ही माहिती दिली आहे.
No decision has been taken yet on the resumption of flight operations. An announcement will be made on time as to when it will resume: Union Minister Prakash Javadekar pic.twitter.com/1M1tPMvt4X
— ANI (@ANI) April 22, 2020
जावडेकर म्हणाले, कोरोनासारख्या महारोगराईपासून देशाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य कर्मचारी प्रयत्न करत आहे. या डॉक्टरवरील हल्ले मोदी सरकार खपवून घेणार नाही. डॉक्टरांविरोधात हिंसाचार किंवा अशी कोणतीही घटना घडल्यास संबंधित आरोपींवर कठोर कारवाईचा सामना करावा लागेल. एखाद्या व्यक्तीने संपत्ती किंवा डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या वाहनाचे नुकसान केले, तर अशा व्यक्ती किंवा व्यक्तींकडून दुप्पट पैसा वसूल केला जाईल, अशीही माहिती जावडेकरांनी दिली. जागतिक महामारी कायदा १८९७ अंतर्गत अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे जावडेकरांनी सांगितले.
In case of grievous injuries, the accused can be sentenced from 6 months to 7 years. They can be penalised from Rs 1 Lakhs to Rs 5 Lakhs: Union Minister Prakash Javadekar pic.twitter.com/VEXjQVz2x8
— ANI (@ANI) April 22, 2020
डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी एक अध्यादेश काढण्यात येणार असून राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर लागू केला जाणार असल्याचेही जावडेकरांनी माहिती दिली. वैद्यकीय पथकावर हल्ला केल्या प्रकरणात ३ महिन्यांपासून ५ वर्षांपर्यंतची शिक्षा होणार आहे.तसेच ५० हजार ते २ लाखांपर्यंत दंडही आकारला येणार असल्याची माहिती जावडेकरांनी सांगितले. हल्ल्यात वैद्यकीय कर्मचाऱ्याचे गंभीर नुकसान झाले तर ६ महिन्यांपासून ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच १ लाख ते ५ लाख रुपये दंड करण्याची तरतूद केल्याची माहिती जावडेकर यांनी दिली आहे.
आयएमएच्या डॉक्टरांना शहांनी दिले सुरक्षेचे आश्वासन
वैद्यकीय कर्मचाऱ्यवरील हल्ल्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांशी निषेध नोंदवा होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आणि प्रतिकात्मक विरोधही न करण्याचे आवाहन शहांनी डॉक्टरांना केले. सरकार कायम डॉक्टरांसोबत आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.