HW Marathi
देश / विदेश राजकारण

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात, पत्नीचा झाला मृत्यु

कर्नाटक | केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला काल (११ जानेवारी) भीषण अपघात झाला. ते कुटुंबासोबत गोकर्ण येथे जात होते. या दरम्यान कर्नाटकातील अंकोला येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले आहेत, तर त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि पर्सनल सेक्रेटरीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद नाईक यांनी गोकर्णला लवकर पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरुन शॉर्टकट घेतला. याचं रस्त्यावर त्यांचा अपघात झाला.

श्रीपाद नाईक यांनी ज्या शॉर्टकटने जाण्याचा निर्णय घेतला होता तो रस्ता खूप खराब होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हे समोर आलंय की घटनास्थळी कुठल्याही दोन वाहनांमध्ये धडक झालेली नाही. पण, रस्ता खराब असल्याने ड्रायव्हरचा कारवरील ताबा सुटला आणि गाडीला अपघाकत होऊन गाडी दरीत उलटली.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी उशिरा रात्री दिलेल्या माहितीनुसार, अपघातात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर सध्या गोव्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुर्घटनेत नाईक यांच्यासोबत गाडी असलेल्या त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि पर्सनल सेक्रेटरीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे श्रीपाद नाईक हे अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.

 

 

Related posts

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार

News Desk

CMO अकाऊंटच्या ‘त्या’ ट्विटबद्दल शहानिशा करु – अजित पवार

News Desk

“राजकारण न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला संजय राऊत अन् जयंत पाटलांना ?”

News Desk