HW News Marathi
देश / विदेश

गुगलकडून अनोखी मानवंदना, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचं डुडल

मुंबई : गुगलने आज डॉ. आनंदीबाई जोशी यांचं त्यांच्या १५३ व्या जन्मदिनी डुडल बनवून त्यांना मानवंदना दिली आहे. आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी कल्याणमध्ये झाला.

लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. 14व्या वर्षी आई झालेल्या आनंदीबाई यांचा मुलगा दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १० दिवसच जगू शकला. या घटनेनं त्यांना बराच धक्का बसला. त्यामुळे आपण डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. गोपाळराव यांनीही त्यांच्या या इच्छेला विरोध न करता त्यांना डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला

१८८३ म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया’मध्ये त्यांना प्रवेश मिळाला. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करुन मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईंनी एम.डी.ची पदवी मिळवली. ज्या काळात महिलांनी बाहेर पडणंही दुरापास्त होतं त्यावेळी आनंदीबाईंनी थेट डॉक्टर होण्यापर्यंतची मजल मारली.

आनंदीबाई या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत की ज्यांनी डॉक्टरकीची पदवी मिळवली. डॉ. आनंदीबाई यांचा जन्म कल्याणमधील एका पारंपारिक कुटुंबात झाला होता. वयाच्या 10व्याच वर्षी त्यांचा कल्याणमधील गोपाळराव जोशी यांच्याशी विवाह झाला होता.

पण डॉक्टर बनण्याचा त्यांचा हा निर्णय फार सोपा नव्हता. त्यावेळी त्यांच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पण या सगळ्यावर मात करत त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी डॉक्टरकीची पदवीही मिळवली.

परदेशातून परतल्यानंतर काही काळ त्यांनी कोल्हापूरमधील एडवर्ड रुग्णालयात कामही केलं. दरम्यान, त्यावेळी तिथेच त्यांना क्षयाची बाधा झाली. आनंदीबाई या शिक्षणासाठी परदेशी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी समुद्र उल्लंघन केलं आहे. असं म्हणत सर्व वैद्यांनी त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे उपचाराअभावी 1887 साली म्हणजेच वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आनंदीबाई यांचा मृत्यू झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिला राजीनामा!

News Desk

#PulwamaAttack : जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही | पंतप्रधान मोदी

News Desk

गांधीजींचा फोटो भारतीय चलनातून काढा | हिंदू महासभा

News Desk