HW Marathi
Covid-19 देश / विदेश

केंद्राच्या अनलॉक-५च्या गाईडलाईन्स जारी, चित्रपटगृह सुरू करण्यास केंद्राची परवानगी!

नवी दिल्ली | केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील अनलॉक-५च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार १५ ऑक्टोबरपासुन अनलॉक-५ मध्ये चित्रपटगृह ५० टक्के क्षमतांनी सुरू करता येणार आहे. या टप्प्यात नवरात्र, दुर्गा पूजा, दसरा यांसारखे सण येणार आहेत. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर लोकांना सणांचा आनंदही घेता यावा याची काळजी घेतली जाणार आहे.

– चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने चालवण्याची परवानगी, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी स्विमिंग पूल उघडणार.

– अनलॉक – ५ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकार १५ ऑक्टोबरनंतर शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

– सामाजिक, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना यापूर्वीच जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीत आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे

– कंटेन्ट झोनमधील कठोर लॉकडाउन ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

– राज्य सरकारांनी कंटेन्मेंट झोनच्या बाहेर स्थानिक पातळीवर लॉकडाउन घोषित करू नये. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर बंदी नाही.

Related posts

नागरिकत्व सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडणार

News Desk

शेतकऱ्यांना २५ हजार रुपये देतो म्हणून सांगितले आणि हाती भोपळा दिला !

News Desk

राज्याचा एकूण रुग्णांचा आकडा ४,४१,२२८ वर पोहोचला

News Desk