HW Marathi
देश / विदेश

केंद्रिय गृहमंत्रालयाकडून अनलॉक ६ च्या गाईडलाईन्स जारी!

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनबाबत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या अनलॉक ६ नुसार आता ३० ऑक्टोबरपर्यंतच्या निर्बंधांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने आज (२७ ऑक्टोबर) पुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती खबरदारी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींमध्ये सूट असेल याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

सामाजिक / शैक्षणिक / क्रीडा / करमणूक / सांस्कृतिक / धार्मिक / राजकीय कार्यक्रमांसाठी बंद जागांमध्ये हॉल क्षमतेच्या जास्तीत जास्त 50% आणि 200 जणांच्या कमाल मर्यादेसह वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, अंतर पाळणे, मास्क वापरणे या गोष्टी अनिवार्य असणार आहेत.

यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या काही गोष्टी सुरु राहतील. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, प्रशिक्षणासाठी जलतरणपटूंसाठी स्विमिंग पूल, तसेच सिनेमा हॉल व मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेसह सुरु करण्यास परवानगी होती.

Related posts

गुलाम नबी आझाद यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा पाकिस्तानला फायदा !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, राहुल गांधींचा आरोप

News Desk

आम्ही १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो, नाहीतर…! प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा

News Desk