नवी दिल्ली | अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सीरियामध्ये इसिसचा पराभव झाल्याचे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियामध्ये तैनात असलेल्या आपल्या जवळपास दोन हजारांच्या अमेरिकी सैन्याला माघारी बोलाविण्याची निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी मॅटिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
United States Secretary of Defense James Mattis steps down
Read @ANI Story | https://t.co/KfaZvimK8n pic.twitter.com/rP73c3AeXB
— ANI Digital (@ani_digital) December 21, 2018
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे जेम्स मॅटिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. परंतु, व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जेम्स मॅटिस यांनी ट्रम्प यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यानंतरच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जेम्स मॅटिस हे भारतावर आर्थिक निर्बंध घालण्याच्या निर्णयाच्या विरोधात होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.