उत्तराखंड | उत्तराखंड येथील चमोली येथे हिमकडा कोसळून पर्वतातून वाहणाऱ्या नद्यांना आलेल्या प्रचंड पुरामध्ये १०० ते १५० जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्य सचिव ओमप्रकाश यांनी दिली. चमोली जिल्ह्यातील रेणी गावाजवळ हा हिमकडा कोसळला असून आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. या जलप्रलयात अनेक ग्रामस्थांची घर वाहून गेली आहेत.आज (७ फेब्रुवारी) धोली नदीला यामुळे मोठा पूर आला आहे. यामुळे या नदीवरील ऋषी गंगा प्रकल्पाचं मोठ नुकसान झालं आहे.
या प्रकल्पात काम करणाऱ्या सुमारे ४० ते ५० बेपत्ता मजूरांना शोधण्यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. आयटीबीपीचे १०० पेक्षा अधिक जवान या मजुरांच्या बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून एनडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. हा हिमकडा चमोली येथून हृषिकेशपर्यंत पोहचणार आहे त्यामुळे जोशीमठ, श्रीनगरपर्यंत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
100-150 casualties feared in the flash flood in Chamoli district: Uttarakhand Chief Secretary OM Prakash to ANI pic.twitter.com/JoR76lWEAb
— ANI (@ANI) February 7, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.