HW News Marathi
देश / विदेश

“कुंभ आणि मकरजमध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही कारण…”,उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यानी सांगितले उत्तर

उत्तराखंड | देशात एकीकडे कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत असताना दूसरीकडे मात्र कुंभमेळा सुरू आहे आणि हजारो भाविक या कुंभमेळ्याला जात आहेत. या ठिकाणी पार पडलेल्या आणि परदेशी नागरिकांनी हजेरी लावलेल्या निजामुद्दीन मकरजसोबत केली जाऊ नये असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी म्हटले आहे. हिंदुस्तान टाइम्ससोबत ते बोलत होते. तसंच कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा येतो आणि हा लोकांच्या श्रद्धा आणि भावनेचा विषय असल्याचंही ते म्हणाले आहेत. लोकांचं आरोग्य प्राथमिकता आहे, पण श्रद्धेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

तिरथ सिंह रावत यांना कुंभ आणि निजामुद्दीन मकरजची तुलना का केली जाऊ नये असं विचारण्यात आलं होतं. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, “कुंभ आणि मकरजमध्ये कोणतीही तुलना होता कामा नये. मकरजचा कार्यक्रम एका बंदिस्त ठिकाणी पार पडला होता. पण कुंभ एका मोकळ्या ठिकाणी गंगेच्या किनारी पार पडत आहे,” असं तिरथ सिंह रावत यांनी सांगितलं आहे.

तिरथ सिंह रावत यांनी यावेळी कुंभमेळा १२ वर्षातून एकदा पार पडत असून हा लोकांच्या श्रद्धा आणि भावनेशी जोडलेला विषय असल्याचं सांगितलं. “कोरोना संकटाचं आव्हान असताना सर्व नियमांचं पालन करत यशस्वीपणे कुंभमेळा पार पाडणं आमचं ध्येय आहे,” असं ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून २ हजारच्या नोटांची छपाई बंद

News Desk

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दाता दरबार दर्ग्याच्या बाहेर स्फोट, १८ हून अधिक जण जखमी

News Desk

धक्कादायक ! प्रसूती करण्यापूर्वी दोन डॉक्टर एकमेकांशी भांडत राहिले.. बाळाचा गर्भात जीव गेला

News Desk