HW News Marathi
देश / विदेश

अलट बिहारी वाजपेयी यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी भाजपाच्या सर्व दिग्गज नेत्यांनी एम्स रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

थोड्याच वेळापुर्वी अटल बिहारी वाजपेय यांच्या प्रकृती बाबत मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून एम्स रुग्णालयाकडून हे मेडीकल बुलेटीन प्रसिद्ध केले आहे.

एम्सच्या मेडिकल बुलेटीनमध्ये काय म्हटलंय?

अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती पहिल्यासारखीच आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

थोड्याच वेळात पुन्हा एक मेडीकल बुलेटीन जाहीर होईल

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देण्यासाठी एम्स प्रशासनाकडून लवकरच एक नवे बुलेटीन जाहीर करण्यात येणार आहे. अटल बिहारींच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी सगळ्यांचे लक्ष सध्या या बुलेटीनकडे लागलेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्नीला गोळी मारण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन मुक्तता देणे केव्हाही चांगले !

News Desk

संघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही | डॉ. भागवत

News Desk

छेडछाडप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या मुलावर कठोर कारवाईची मागणी

News Desk