नवी दिल्ली | देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. भारतीय वायूदलाचे M-17V5 हेलिकॉप्टर तमिळनाडूमधील कन्नरमध्ये आज (८ डिसेंबर) दुपारी कोसळले होते. बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेही निधन झाले आहे. रावत यांचे पार्थिव उद्या दिल्लीला पोहचणार आहे. रावत यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. रावत यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे.
“सीडीएस बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक आणि एक सच्चे देशभक्त होते. रावत यांनी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती,” असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी रावत यांना श्रद्धांजली वाहिली.
Gen Bipin Rawat was an outstanding soldier. A true patriot, he greatly contributed to modernising our armed forces and security apparatus. His insights and perspectives on strategic matters were exceptional. His passing away has saddened me deeply. Om Shanti. pic.twitter.com/YOuQvFT7Et
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2021
आज देशासाठी अतिशय दु:खाचा दिवस आहे. आपण सीडीएस बिपीन रावत प्रमुख जनरल बिपीन रावत यांना गंभीर अपघातात गमावलेय. ते एक शूर सैनिक होते, त्यांनी मातूभूमीची अत्यंत निष्ठेने सेवा केली, त्यांचे योगदान शब्दात मांडता येणार नाही. मधुलिका रावत आणि ११ सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांच्या निधनाबद्दलही मी मनापासून शोक व्यक्त करतो. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
A very sad day for the nation as we have lost our CDS, General Bipin Rawat Ji in a very tragic accident. He was one of the bravest soldiers, who has served the motherland with utmost devotion. His exemplary contributions & commitment cannot be put into words. I am deeply pained.
— Amit Shah (@AmitShah) December 8, 2021
I also express my deepest condolences on the sad demise of Mrs Madhulika Rawat and 11 other Armed Forces personnel. My thoughts are with the bereaved families. May God give them the strength to bear this tragic loss.
Praying for the speedy recovery of Gp Capt Varun Singh.
— Amit Shah (@AmitShah) December 8, 2021
“संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व सोबतच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला आहे. या शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे ट्वीट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व सोबतच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला आहे. या शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 8, 2021
मी जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करतो. ही शोकांतिका आहे. या कठीण काळात आमचे विचार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. दुर्घनेत प्राण गमावलेल्या इतर सर्वांबद्दलही दु:ख व्यक्त करतो. या दु:खात भारत एकजुटीने उभा आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे.
I extend my condolences to the family of Gen Bipin Rawat and his wife.
This is an unprecedented tragedy and our thoughts are with their family in this difficult time.
Heartfelt condolences also to all others who lost their lives.India stands united in this grief.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 8, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.