HW News Marathi
देश / विदेश

विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक, काही वेळातच जामीन मंजूर

लंडन : भारतातील बँकांना चुना लावून परदेशात पळालेला विजय मल्ल्याला अखेर अटक करण्यात आले आहे.अटक करण्यात आल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याला जामीनदेखील मंजूर करण्यात आला.मनी लाँडरिंगच्या प्रकरणात विजय मल्ल्याला अटक करण्यात अल्याची माहिती ब्रिटनच्या क्राऊन प्रोसिक्युशन सर्व्हिसने दिली.

अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) अर्जानंतर लंडनमध्ये अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. विजय मल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी भारताकडून आता प्रयत्न केले जातील. तशी परवानगी मिळाल्यास विजय मल्ल्याला भारतात आणले जाईल. किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचे कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. मल्ल्याकडून एसबीआय बँकेला सहा हजार ९६३ कोटींची किंमत येणे अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने १४११ कोटींची संपत्ती जप्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#COVID19 : देशातील ६३ टक्के कोरोनाबळींचे वय ६० पेक्षा अधिक, आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk

नव्या वर्षात रोजगारसंधीसाठी मोदी सरकार राबविणार नवी योजना

News Desk

मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित होणार शेतकरी आंदोलन !

News Desk