HW News Marathi
देश / विदेश

या संकटसमयी अर्थमंत्री माझे नक्की ऐकतील…

नवी दिल्ली | देशाला कोरोना विषाणूने घट्ट आवळून धरले आहे. याच पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. याचा फटका देशाच्या आर्थिक तिजोरीलाही बसला आहे. त्यातच एक भर म्हणजे बॅंकांचे कोटी रुपये बूडवून परदेशात पळून गेलेले उद्योगपती विजय माल्या यांनी ट्विटरवरुन सर्व कर्ज परतफेड करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच, सरकारकडे त्यांचे जे भारतात उद्योग आहेत त्यासाठी मदतीची मागणी केली आहे. जगभारात कोरोनाने थैमान घातले आहे त्यामूळे सर्व उद्योग ठप्प झाले आहेत. त्यामूळे भारतातील माल्या यांचेही अनेक उद्योग बंद पडले आहेत आणि आर्थिक नुकसानही होत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी ट्विट करत बॅंकेचे सगळे कर्ज फेडण्यास मी तयार आहे, अनेकदा मी ही तयारीही दाखवली होती. पण, बॅंका पैसा घेण्यासाठी आणि प्रवर्तन संचलनालय मदत करण्यासाठी तयार नसल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामूळे, या संकटसमयी अर्थमंत्री माझे नक्की ऐकतील अशी आशा माल्या यांनी व्यक्त केली आहे.

विजय माल्या यांनी ट्विटमध्ये काय लिहीले आहे…

भारतात लॉकडाऊन आहे आणि त्याची कल्पना कोणी केलीही नव्हती. सरकारच्या या निर्णयाचा मी सन्मान करतो. मात्र, यामुळे माझ्या सर्व कंपन्यांचे काम बंद झाले आहे. तरीही आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला देत आहोत. अशा कठीण प्रसंगी सरकारने आम्हाला मदत करावी, असे एका ट्विटमधये त्यांनी लिहिले आहे.

तर, दुसऱ्या ट्विटमध्ये विजय माल्यांनी कर्ज फेडण्याची तयारी दाखवली आहे. मी KFA च्या मार्फत बॅंकेतून घेतलेले कर्ज १०० टक्के परत करण्याचा प्रस्ताव वारंवार केला होता. मात्र, बॅंका पैसे घेण्यास तयार नाही आहेत आणि ईडीदेखील बॅंकांच्या सांगण्यावरुन माझ्याशी तडजोड करण्यास तयारी दर्शवत नाही आहे. मला आशा आहे की या संकट काळात अर्थंमंत्री माझे ऐकतील आणि मदत करतील. दरम्यान, गेली ४ वर्षे विजय माल्या लंडनमध्ये वास्तव्य करत आहे. त्यांच्याकडे बॅंकेचे ९ हजार कोटींचे कर्ज आहे आणि ट्विटरच्या माध्यमातून हेच परतफेड करण्याची ते तयारी दाखवत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताकडून इतर देशांना स्वस्त दरात पेट्रोल विक्री

News Desk

बाबराच्या मशिदीसाठी जे लोक शतकांपासून मातम करीत आहेत ते हरामखोर !

News Desk

काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या युवासेना कार्यकर्त्यांची हकालपट्टी

News Desk