नवी दिल्ली | भारतीय बँकांचे तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर ब्रिटनच्या गृह सचिवांनी ३ फेब्रुवारी रोजी अखेर स्वाक्षरी केली. मात्र, विजय मल्ल्याने भारतात येण्यास नकार दिला असून या निर्णयाविरोधात ते वरच्या न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती विजय मल्ल्या यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. विजय मल्ल्या या निर्णयाला आव्हान देऊ शकतो, अशी शक्यता यापूर्वीच वर्तविण्यात आली होती.
After the decision was handed down on December 10,2018 by the Westminster Magistrates Court, I stated my intention to appeal. I could not initiate the appeal process before a decision by the Home Secretary. Now I will initiate the appeal process.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 4, 2019
ब्रिटनच्या गृह सचिवांकडून मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली असली तरीही मल्ल्याकडे या विरोधात अपिल करण्याचा पर्याय उपलब्ध होता. गृह सचिवांकडून स्वाक्षरी करण्यात आल्यानंतर पुढच्या १४ दिवसांत विजय मल्ल्या प्रत्यार्पण आदेशाला आव्हान देऊ शकतो. विजय मल्ल्याने त्याच दिशेने पावले उचलायला सुरुवात केली असून अपीलची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती स्वतः विजय मल्ल्याने दिली आहे. दरम्यान, मल्ल्याविरोधात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत ब्रिटनच्या गृह सचिवांनी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती सचिव कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.