HW News Marathi
देश / विदेश

बाबा राम रहिमच्या ‘त्या’ इशाऱ्यामुळेच हरियाणात हिंसाचार

नवी दिल्ली- बलात्कार प्रकरणी सीबीआय न्यायालयाने बाबा राम रहिम याला शिक्षा सुनावताच हरियाणामध्ये मोठा हिंसाचार झाला. त्यात 32 जणांचा बळी गेला तर शेकडो वाहने, मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. परंतु हे सर्व कृत्य करण्याचे आधीपासूनच ठरलेले होते. केवळ बाबाच्या एका इशाऱ्यावर हे कृत्य करण्यात आल्याची बाब समोर येत आहे. बाबाला शिक्षा सुनावल्यानंतर त्याने एका बॅगेची मागणी केली. ही बॅग होती लाल रंगाची. बॅगेत आपले कपडे असल्याचे सांगत बाबांनी ही बॅग आपल्या ताब्यात घेतली. ही बॅग बाबाच्या हाती दिसताच्या त्याच्या अंध भक्तांनी तिकडे हिंसाचाराला सुरूवात केली. खरे तर बाबाने शिक्षा होण्यापूर्वीच आपल्या अनुयायांना रेड बॅगचे संकेत दिले होते. मी जर हातात लाल बॅग घेतली तर हिंसा माजवा, असा इशारा दिला होता. झाले त्यानुसार. शिक्षा सुनावल्यानंतर बाबाने लाल बॅग हाती घेतली आणि संपूर्ण राज्यात हिंसेचे लोण पसरले. ही सर्व माहिती पोलिसांनी जारी केली आहे. बाबा व त्याच्या भक्तामध्ये हिंसा करून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा कुटील डाव होता, हे आता लपून राहिलेला नाही. दोन साध्वीवर अमानुष अत्याचार करून बलात्कार केल्याप्रकऱणी सीबीआय न्यायालायने बाबाला प्रत्येकी दहा वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. सध्या बाबा सिरसा येथील जेलमध्ये सश्रम कारावासाची शिक्षा भोगत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंगळुरूमध्ये ‘एअर शो’दरम्यान २ सूर्यकिरण विमानांची धडक

News Desk

भारताकडून अफगाणमध्ये अडकलेल्या नागरिकांना एरलिफ्ट!

News Desk

#NirbhayaCase : आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली, दोषींना फाशी अटळ

News Desk