कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणूकीचे वारे वाहत आहे. आज (१ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. विशेष म्हणजे बंगालमधील अतिशय हायप्रोफाइल नंदीग्राम मतदारसंघाचाही यात समावेश आहे. या मतदानाला काही ठिकाणी हिंसाचाराचं गालबोट लागलं आहे. या हिंसाचारातही सकाळी सकाळी ११.३१ पर्यंत ३७.४२ टक्के मतदान झालं होतं. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरवात झाली आहे.
पश्चिम बंगालमधील केशपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तन्मय घोष यांच्या कारवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला आहे. यासोबतच १७३ क्रमांकाच्या बुथवरील भाजपच्या एका पोलिंग एजंटला मारहाण करण्यात आली. या पोलिंग एजंटला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे.
A BJP worker was beaten up in Samsabad's Kanchan Nagar area today…One Amirul behind the death by hanging of a BJP worker in Maheshnagar, Nandigram. The police is taking action. The overall situation today is peaceful: BJP leader Suvendu Adhikari #WestBengalElections pic.twitter.com/XQ552RWP6X
— ANI (@ANI) April 1, 2021
याशिवाय प्रसार माध्यमांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील कमलापूरच्या १७० व्या मतदान केंद्राजवळ हा हल्ला झाला आहे. या हिंसक घटनांवरून भाजप नेते आणि नंदीग्राममधील पक्षाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी टीएमसीवर निशाणा साधला आहे. हे हल्ले पाकिस्तानी समर्थकांचे आहेत. जय बांगला ही घोषणा बांगलादेशतील आहे. काही समाजातील मतदार हे असे हल्ले करत आहेत, असा आरोप सुवेंदू अधिकारी यांनी केला.
West Bengal: Vehicle of media personnel attacked near booth number 170 in Kamalpur, Nandigram.
"These are work of Pakistanis, 'Jay Bangla' is a slogan from Bangladesh. There are voters from a particular community at that booth who are doing this," says BJP's Suvendu Adhikari pic.twitter.com/gMsENDDnA5
— ANI (@ANI) April 1, 2021
नंदीग्राममधील शमशाबादच्या कांचननगरमध्ये भाजप कार्यकर्त्याला माराहण झाली. महेशनगरमध्ये भाजप कार्यकार्त्याची हत्या केली गेली. या प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू आहे. इतर ठिकाणी मतदान शांततेत होत आहे, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची अज्ञातांनी चाकूने भोसकून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अट केली आहे. तर पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बुथ ताब्यात घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. देबरा मतदारसंघातील भाजपचे मंडल अध्यक्ष मोहन सिंग यांना पोलिसांनी अटक केली आहे. देबरामधील भाजपच्या उमेदवार भारती घोष या मतदान केंद्रांवर जाऊन मतदारांना प्रभावित करण्याता प्रयत्नन करत असल्याचा आरोप, टीएमसीने केला आहे.
West Bengal: BJP polling agent at booth number 173 in Keshpur beaten up allegedly by TMC workers. The polling agent has been rushed to a hospital. BJP leader Tanmay Ghosh's car vandalised
Details awaited
— ANI (@ANI) April 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.