HW News Marathi
देश / विदेश

वोडाफोन, एअरटेल आता तुमचे सिम बंद करणार ?

मुंबई | वोडाफोन, आयडिया आणि भारती एअरटेलने घेतलेल्या निर्णयानुसार जे सिम कार्ड धारक सरासरी ३५ रुपये प्रति महिना सिम कार्डमध्ये रीचार्ज करतात अशा साधारणतः २५० दशलक्ष २ जी वापरकर्त्यांना या मोबाइल कनेक्शनमधून बाद ठरविणार आहेत. २५० दशलक्ष ग्राहक हे ड्युअल सिम धारक आहेत, याचा अर्थ त्यांच्याकडे दोन मोबाइल कनेक्शन आहेत आणि ते केवळ इनकमिंग कॉलसाठी कमी रिचार्ज करुन सिम कार्डचा वापर करतात.

सध्या, एअरटेलच्या ग्राहकांपैकी जवळजवळ १०० दशलक्ष वापरकर्ते असे आहेत जे महिन्याला ३५ रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रीचार्ज करतात. तर व्होडाफोन, आयडियाचे ३५ रुपयांपेक्षा कमी पैशांचा रीचार्ज करणारे ग्राहक १५० दशलक्ष हून अधिक आहेत. एअरटेल जेव्हा ३५ रुपयांपासून सुरूवात करीत आहे तेव्हाच व्होडाफोनने पाच नविन योजना आखल्या आहेत. यामध्ये सर्वात कमी रिचार्ज ३५ रुपये प्रति महिना असणार आहे.

सरासरी प्रत्येक वापरकर्त्यामागे या कंपन्यांना १० रुपये मिळत होते. त्यामुळे ३५ रुपयांचा नविन प्लॅन मार्केटमध्ये आणण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सिम कार्ड सुरु ठेवायचे असल्यास कमीत कमी ३५ रुपयांचा रीचार्ज ठेवणे बंधनकारक असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताने जगाला युद्ध नाही, तर बुद्ध दिला !

News Desk

दिल्लीत शेतकरी आक्रमक, पोलिसांचा लाठीचार्ज

News Desk

मराठमोळे मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला

News Desk