HW Marathi
देश / विदेश राजकारण

Delhi Assembly Elections 2019 : आज दिल्लीकरांचे भवितव्य होणार सीलबंद

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज (८ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजता मतदानास सुरुवात होणार आहे.  दिल्ली विधानसभेची निवडणूक ७० जागांसाठी एकाच टप्प्यात होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीच्या निवडणुकीसाठी १३ हजार ७५० पोलिंग बूथवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दरम्यान, २०१५च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची सत्ता आली होती. आपने ७० जागांपैकी ६७ जागांवर विजयी मिळवत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपला फक्त ३ जागांवर यश मिळाले होते. तर काँग्रेसचे डिपॉजिट जप्त झाले होते. आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत. दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही.

Related posts

छगन भुजबळांवर शिवसेनेची बॅनरमधून जहरी टीका

News Desk

नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील !

News Desk

समीर भुजबळांना जामीन मंजूर

News Desk