HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेस सरकारच्या काळात तुरुंगात असताना माझा प्रचंड छळ झाला !

मुंबई | आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त भोपाळमधील भाजप मुख्यालयात भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रज्ञासिंह ठाकूर म्हटले की, काँग्रेस सरकारच्या काळात तुरुंगात असताना माझा प्रचंड छळ झाला. त्यामुळे सध्या मला अनेक शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागत, असा आरोप त्यांनी केला. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नेहमीच वादग्रस्त विधान करतात. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात यांचे काय पडसाद उपटतील हे पाहावे लागणार आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाली, काँग्रेसच्या राजवटीत मी नऊ वर्षे तुरुंगात होते. तुरुंगात झालेल्या छळादरम्यान मला अनेक दुखापती झाल्या होत्या. तसेच अनेक जुन्या व्याधीही बळावल्या. या सगळ्यामुळे माझ्या डोळ्यांचा रेटिना आणि मेंदूत सूज आणि पू तयार झाला. त्यामुळे मला उजव्या डोळ्याने भुरकट दिसते. तर डाव्या डोळ्याने मला काहीच दिसत नाही. हे सगळे काँग्रेसच्या काळातील छळामुळे झाल्याचे त्यांनी कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्लू व्हेल’ गेमच्या अॅडमीनला अटक

News Desk

आंतरराष्ट्रीय वेबसाईट्सना जगभरात Error, ‘या’ साईट्स ओपनच होईनात…

News Desk

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी!

News Desk