HW Marathi
देश / विदेश

…मग राजीव गांधींची हत्या देखील अपघातच होता का ?

नवी दिल्ली | “राजीव गांधींबद्दल पूर्णपणे आदर बाळगत मी दिग्विजय सिंह यांना एक प्रश्न विचारू इच्छितो कि, राजीव गांधींची हत्या ही दहशतवाद्यांची कारवाई होती की तो देखील अपघात होता ?”, असेही केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे. राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’ असे संबोधल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर व्ही.के.मंत्री यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

“ज्या प्रकारे अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर त्या कारवाईचे सबळ पुरावे संपूर्ण जगापुढे ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या भारतीय वायू दलाने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे”, असे विधान दिग्विजय सिंह यांनी केले होते. दिग्विजय सिंह यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होण्यास सुरुवात झाली आहे. “पंतप्रधान मोदीजी, तुमच्या सरकारमधले काही मंत्री म्हणतात ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, अमित शाह म्हणतात २५० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर योगी आदित्यनाथ म्हणतात ४०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र तुम्ही याबाबत काहीही बोलत नाही”, असेही दिग्विजय सिंह यांनी म्हटले होते.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी देखील दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली होती. “दिग्विजय सिंह हे मोदींच्या विरोधाने आंधळे झाले आहेत. पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. हे देशासाठी लज्जास्पद आहे. ते मोदींचा विरोध करता करता आता भारतमातेचा विरोध करू लागले आहेत”, असे शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले होते. मध्य प्रदेशात रविवारी (३ मार्च) विरोधकांच्या भूमिकेविरोधात निदर्शने, धिक्कार सभा देखील घेण्यात आल्या होत्या. “काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचे खच्चीकरण का करत आहेत ? ज्या विधानांमुळे शत्रूला फायदा होईल अशी विधाने विरोधकांकडून का केली जात आहेत ?” असा सवाल पंतप्रधान मोदींनी देखील केला होता.

Related posts

धर्माच्या रक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या

News Desk

Breaking News | केरळच्या सबरीमाला मंदिरात आता महिलांनाही प्रवेश

News Desk

तमिळनाडूत जलिकट्टूदरम्यान २ जणांचा मृत्यू

News Desk