HW News Marathi
Covid-19

आपण सध्या कोरोनाच्या नव्या अन् धोकादायक टप्प्यावर, WHO चा इशारा 

नवी दिल्ली | संपूर्ण जगभराला कोरोनाचा घट्ट विळखा आहे. जगभरातील अनेक देश सध्या या विषाणूचा सामना करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO च्या प्रमुखांनी एक भीती व्यक्त केली आहे. WHOचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयेसस म्हणाले कि, “आपण कोणाच्या नव्या आणि धोकादायक टप्प्यावर आहोत. कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगाने होत आहे. गेल्या २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांची झालेली नोंद सर्वाधिक आहे. नव्या कोरोनाबाधितांपैकी निम्मे कोरोनाबाधित तर उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडातच आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण आणि पश्चिम आशिया खंडातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.”

“सद्यस्थितीत आपण कोरोना संसर्गाच्या नव्या आणि धोकादायक टप्प्यावर आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलणे महत्त्वाचे आहे. या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. फिजिकल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, स्वच्छतेचे सर्व पाळणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग अत्यंत वेगाने पसरत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये स्थलांतरितांचे संख्या अधिक असून त्यापैकी ८० टक्क्यांहूनही जास्त जण हे विकसनशील देशातील आहेत”, असे WHO च्या प्रमुखांनी सांगितले आहे.

जगातील ‘कोरोना’स्थिती काय ?

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत तब्बल ८७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर जगभरात आतापर्यंत तब्बल ४ लाख ६१ हजारांहूनही अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, जगभरात आतापर्यंत तब्बल ४६ लाख २० हजारांहूनही अधिक जणांनी यशस्वीरीत्या कोरोनवर मात केली आहे. दरम्यान, जगभरात केवळ ८ देशांमध्ये जवळपास ६२% कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! बीडमध्ये कोरोना योद्ध्याला मिळाली नाही ॲम्बुलन्स, पॉझिटिव्ह असताना रात्रभर ड्युटी

News Desk

राज्यात आज ९,१८१ नवे रुग्ण तर २९३ जणांचा झाला मृत्यू

News Desk

अहमदनगरमध्ये कोरोना निगेटिव्ह असलेले रुग्ण निघाले पॉझिटिव्ह

News Desk