HW Marathi
देश / विदेश

आम्ही लक्ष्य पूर्ण करतो, किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला हे मोजणे आमचे काम नाही !

नवी दिल्ली | “आम्ही फक्त आमच्यापुढे एक लक्ष्य ठेवतो आणि ते पूर्ण करतो. आमच्या कारवाईत किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला हे मोजणे आमचे काम नाही”, असे भारतीय वायू दलाचे प्रमुख बी.एस. धनुआ यांनी स्पष्ट केले आहे. धनुआ यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय वायू दलाच्या एअर स्ट्राईक संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. दरम्यान, या हवाई हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला, याबाबत आता मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

“आम्ही फक्त आमच्यापुढे एक लक्ष्य ठेऊन ते लक्ष्य पूर्ण करतो. आम्ही केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले किती किंवा जिवीतहानी झाली ? हे मोजणे आमचे नाही तर सरकारचे काम आहे”, असे धनुआ यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Related posts

बोट उलटल्याने ११ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

News Desk

#PulwamaAttack : जाणून घ्या… ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ म्हणजे काय ?

News Desk

नीरव मोदीच्या ९ कार ईडीकडून जप्त

News Desk