HW Marathi
देश / विदेश राजकारण

विमान नको…केवळ जम्मू-काश्मीरमधील लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य द्या !

नवी दिल्ली | “तुम्हाला आणायला विमान पाठवतो, स्वतः काश्मीरमध्ये येऊन इथली परिस्थिती पाहा”, असा खोचक टोला जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना खोचक टोला लगावला होता. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सत्यपाल मलिक बोलत होते. “विरोधी पक्षनेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुम्ही दिलेल्या निमंत्रणासाठी तुमचे आभार. मात्र, आम्हाला विमान पाठवण्याची आवश्यकता नाही. केवळ तेथे फिरण्याचे आणि तेथील सामान्य लोकांशी संवाद साधण्याचे स्वातंत्र्य आम्हाला मिळेल याची खात्री करा”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

“जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये नेमकी काय स्थिती आहे ? याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी”, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर सत्यपाल मलिक म्हणाले होते कि, “तुम्ही स्वतः येऊन इथल्या परिस्थितीचा आढावा घ्या. आम्ही हवंतर तुमच्यासाठी विमान पाठवतो.” त्यावर “तुम्ही आम्हाला दिलेल्या निमंत्रणाबद्दल तुमचे आभार ! मी आणि विरोधी पक्षनेते आम्ही जम्मू-काश्मीर आणि लडाखला भेट देऊ. मात्र, आम्हाला तुम्ही विमान पाठविण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा आम्ही जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये येऊन तेव्हा तेथे फिरण्याचे, तेथील लोक, तिथल्या मुख्य प्रवाहातील नेते आणि भारतीय सैन्याला भेटण्याचे आम्हाला स्वातंत्र्य असेल याची मात्र खात्री करा”, असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.

Related posts

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात

News Desk

अखेर मराठवाड्यात दमदार पावसाची हजेरी

News Desk

माझ्या बंगल्यासमोर सकाळपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची रांग लागते !

News Desk