कोलकाता | पश्चिम बंगाल डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर संपूर्ण देशभरातून एक दिवसीय संप पुकारून निषेध व्यक गेला आहे. या प्रकरणामुळे सर्व बाजून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका होत आहे. यानंतर ममता यांनी बांग्ला भाषेचे कार्डचा वापरून करून बंगालमधील परप्रांतियांवर निशाणा साधला आहे.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee: We have to bring Bangla forward. When I go to Bihar, UP, Pujnab, I speak in their language, if you are in Bengal you have to speak Bangla. I will not tolerate criminals who stay in Bengal and roam around on bikes. pic.twitter.com/rs6FSBzCst
— ANI (@ANI) June 14, 2019
बाहेरच्या लोकांवरून भाजपवर नेम दरत त्यांनी जर बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली बोलता आलीच पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. तसेच अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर फिरतात, असेही ममता एका कार्यक्रमात म्हणाल्या.
उत्तर परगना जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करताना ममता यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपल्याला बंगाली भाषेला पुढे आणले पाहिजे. जेव्हा मी बिहार, उत्तर प्रदेश किंवा पंजाबमध्ये जाते तेव्हा तेथील भाषा बोलते. जर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये राहत असाल तर तुम्हाला बंगाली भाषा आलीच पाहिजे. अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर इकडे तिकडे फिरतात, असे ममता म्हणाला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.