HW Marathi
HW एक्सक्लुसिव अर्थसंकल्प २०२० देश / विदेश राजकारण

Economic Survey 2020| आर्थिक सर्वे म्हणजे काय ? तो बजेटच्या एक दिवस आधी का मांडला जातो …

दिल्ली | अर्थव्यवस्था अत्यंत अडचणीत असताना देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प येत्या शनिवारी म्हणजे १ फेब्रुवारीला सादर होतो आहे. दरवर्षीप्रमाणेचं यंदासुद्धा अर्थसंकल्पाच्या १ दिवस अगोदर म्हणजे ३१ जानेवारीला आर्थिक सर्वे मांडला जाईल.   

अर्थमंत्री निर्मला सितारमण हा आर्थिक सर्वे संसदेत मांडणार आहेत. गेल्या काही दिवसांपासुन भारतीय अर्थव्यवस्थेची असलेल्या नाजुक परिस्थितीच्या पार्श्वभुमिवर हा आर्थिक सर्वे अत्यंत महत्वपुर्ण मानला जात आहे. मात्र हा आर्थिक सर्वे म्हणजे काय, तो कसा मांडला जातो या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज देण्याचा आमचा प्रयत्न आहे..

आर्थिक सर्वे म्हणजे काय?

आर्थिक सर्वे म्हणजे वर्षभरातल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीचाअहवाल . या अहवालावरून जवळजवळ हे स्पष्ट होतं की वर्षभरामध्ये आर्थिक दृष्टीने देशाची परिस्थिती कशा पद्धतीची राहिली आहे.याशिवाय हेसुद्धा स्पष्ट होते की येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेसाठी कोणत्या गोष्टींची तरतुद होऊ शकते.अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर या अहवालात अर्थव्यवस्थेचा संपुर्ण चेहरा कळून येतो. बऱ्याच वेळा आर्थिक सर्वेनंतर सरकारला सुचना दिल्या जातात , या सुचना लागु करण्यासंदर्भातला हक्क हा सरकारचा असतो .

आर्थिक सर्वे कसा तयार केला जातो ?
आर्थिक सर्वे हा मुख्य वित्त सल्लागार आणि त्यांच्या टीमकडून वित्त मंत्रालयात तयार केला जातो . यावेळी कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अशा परिस्थितीत कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वात आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात येईल हे स्पष्ट आहे .अर्थ मंत्रालयातले हे महत्त्वपूर्ण कागदपत्र अर्थमंत्रिच सभागृहात सादर करतात .

यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक सर्वे सादर करणार आहेत. गेल्या वर्षी 4जुलै रोजी निर्मला सीतारमण यांनी त्यांचा पहिलाआर्थिक सर्वे सादर केला होता यानंतर 5जुलैला मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. देशातील पहिला आर्थिक सर्वे 1950-51 मध्ये सादर केले गेला होता . अर्थमंत्रालयाच्या वेबसाइटवर 1957-58 पासून पुढील काळातील सर्व कागदपत्रे देखील उपलब्ध आहेत.

 आर्थिक सर्वे कुठे पाहता येईल ?

31 जानेवारी रोजी सादर होणार आर्थिक सर्वे लोकसभा टीव्हीवर थेट याशिवाय पीआयबी https://pib.gov.in/indexd.aspx आणि https://www.indiabudget.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरही पाहता येईल.

Related posts

पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे – नारायण राणे

News Desk

कोरोनामुक्त गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ‘प्लाझ्मा दान’करण्याचा निर्णय …

News Desk

शरद पवारांनी राज्यसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज, फौजिया खान मात्र प्रतिक्षेत