HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : जाणून घ्या… ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ म्हणजे काय ?

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर गुरुवारी (१४ फेब्रुवारी) दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये ३९ जवान शहीद झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमधील आहे. या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरने पाकिस्तानातून संपूर्ण कारवायांची सूत्रे हलवली आहेत. या हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानचा तीव्र निषेध केला जात आहे.

संपूर्ण देशभरातून या हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या हल्लाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली आहे. या हल्ल्याचा परिणाम म्हणून पाकिस्तान विरोधात व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तान विरोधात हे सर्वात मोठे पाऊल उचलेले आहे. परंतु मोस्ट फेवर्ड नेशनचा अर्थ काय?

नेमके काय आहे मोस्‍ट फेवर्ड नेशन दर्जा?

ज्या देशांना मोस्‍ट फेवर्ड नेशन(एमएफएन)चा दर्जा मिळतो, त्या देशाला व्यापारात अधिक प्राधान्य दिले जाते. त्या देशाला व्यापाराबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर सुविधा मिळतात. हा दर्जा मिळाल्यानंतर या देशातील व्यापाराच्या आयात आणि निर्यातीत विशेष सूट मिळते. मोस्ट फेवर्ड नेशनच्या नियमानुसार, कोणताही देश विविध देशांमधील व्यापारासंबंधी करारात भेदभाव करू शकत नाही. एमएफएनच्या नियमा अंतर्गत दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे पालन करणे गरजेचे असते. याचा अर्थ असा की, व्यापारात मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळालेला देशांना, दुसऱ्या देशाच्या तुलनेत तोट्यात राहणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांच्या अर्थव्यवस्थेला त्यांना लाभ मिळतो.

भारताने पाकला मोस्‍ट फेवर्ड नेशन दर्जा दर्जा दिला ?

जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेनंतर भारतामुळे पाकिस्तानला १९९६ मध्ये मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला होता. परंतु आश्वासन देऊनही पाकिस्तानने आजपर्यंत भारतला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिलेला नाही. उरी हल्ल्यानंतर भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या एमएफएन दर्जाबाबत चाचपणी केली होती.

मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा कधी काढतात?

जागतिक व्यापार संघटनेने कलमानुसार आर्टिकल २१बी अंतर्गत मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा कधी मागे घेतला जाऊ शकतो. हे सांगितली आहे. या कलमात म्हटले आहे की, दोन्ही देशांमध्ये सुरक्षेसंबंधीत वाद सुरू असेल तर मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेऊ शकतो. मात्र यासाठी अनेक अटी आणि शर्ती पूर्तता कराव्या लागतात.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले – सामना

News Desk

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या दिसला, पंजाबमध्ये हायअलर्ट

News Desk

कुलभूषण जाधवांना सोडवा, हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल!

News Desk