HW News Marathi
देश / विदेश

वडीलांच्या अंत्यसंस्कारात मुली नाचतात तेंव्हा..

नवी दिल्ली: घरातील कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यास त्या कुटुंबावर संकटाचा डोंगरच कोसळतो. परंतु दिल्लीत भलताच प्रकार घडला आहे. चार मुलींनी आपल्या मोठ्या जल्लोषात आपल्या वडीलांची अत्यंयात्रा काढून सर्वांनाच धक्का दिला. जन्म झाल्यावर ज्या प्रमाणे जल्लोष केला जातो, तसाच जल्लोष मृत्यूनंतरही केला जावा, अशी वडीलांची इच्छा होती, म्हणून चारही मुलींनी तशा प्रकार वडीलांचे अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारासाठी फुलांची गाडी तयार करण्यात आली. मिरवणुकीप्रमाणे बँडही लावण्यात आला होता. चारही मुली संपूर्ण अंत्ययात्रेत नाचत गेल्या आणि वडिलांचे अंत्यसंस्कार केले. उद्योजक संघटनेचे माजी अध्यक्ष हरिभाई लालवाणी असे मृत वडीलांचे नाव आहे. ज्याप्रमाणे बाळ जन्मताच उत्सव साजरा केला जातो, तशाच रीतीने माझ्या मृत्यूनंतर अंत्ययात्राही उत्सवासारखी साजरी करा, मृत्यू हा जीवनापेक्षाही सुंदर असेल. जो मिळवण्यासाठी जीवन गमवावे लागतो. सुंदर मृत्यूला भेटण्याचा त्यांचा हा प्रवास अंतिम उत्सवाच्या रूपात साजरा केला जावा, अशी वडीलांची इच्छा असल्याचे मुलीने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार 

News Desk

शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर मणी सी कप्पन यांची पक्षातून हकालपट्टी

News Desk

मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल, त्यावर नरेंद्र मोदींनी केलं ट्वीट

News Desk