HW News Marathi
Covid-19

नव्या वर्षाचं नागरिकांना गिफ्ट,  WHOकडून  फायझरच्या लसीला मान्यता

नवी दिल्ली | २०२१ या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जगाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. फायझर बायोटेकच्या लसीला आपातकालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेकडून फायझरच्या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. WHOच्या या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि निर्यातीचा मार्ग मोकळा झालाय. ब्रिटननं 8 डिसेंबरला या लसीच्या वापरासाधी सर्वात आधी परवानगी दिली होती.

त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनिअन देशांनीही या लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी दिली.. कोरोनाचा फैलाव झाल्यापासून आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळालेली फायझर बायोटेक ही पहिलीच प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. संपूर्ण जगाला कोरोना लस उपलब्ध व्हावी यासाठी हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं WHOनं म्हटलं आहे. कोरोना लसीच्या मंजुरीबाबत आज एक्सपर्ट कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आत्पकालिन वापरासाठी दोन्ही लसींना मान्यता मिळू शकते. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लस प्राथमिकता असणार्‍या लोकसंख्येपर्यंत पोहोचावी यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात जागतिक प्रयत्नाची गरज आहे यावर मी भर देऊ इच्छिते, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक देशांमधील नियामक प्रशासनाला कोरोना लसीच्या आयात आणि वितरणाला परवानगी देण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने आपले तज्ज्ञ तसेच जगभरातील इतर तज्ज्ञांनाही फायझर-बायोटेकच्या सुरक्षा, दर्जा तसेच इतर गोष्टींची पडताळणी करण्यास सांगितले होते. यादरम्यान फायझर-बायोटेकची लस सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर योग्य असल्याचे समोर आले. तसेच कोरोनामुळे निर्माण होणारे धोके लसीमुळे दूर होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा

News Desk

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री म्हणतात…

News Desk

केंद्राच्या भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय

News Desk