HW News Marathi
देश / विदेश

कोण आहे स्टीफन हॉकिंग

केंब्रिज | जेष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ वर्षी निधन झाले. त्यांनी केंब्रिज येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. हॉकिंग यांनी विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरांसंदर्भात त्यांनी मांडलेला सिद्धात विज्ञानिक जगात महत्त्वापूर्ण मानला जातो. त्यांच्या जाण्याने विज्ञान जगाततील लोकांसाठीच नव्हे तर, संपूर्ण जगासाठी कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

इंग्लंड मधील ऑक्सफर्ड येथे स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधन होते, तर त्यांची आई ही इझोबल ऑक्सफर्डमधून पदवी घेतली. हॉकिंग यांना लाहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. हॉकिंग यांना सेंन्ट अल्बान्स स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आहे. त्यांना पहिल्यापासूनच विज्ञान विषयात रस होता. त्यांनी १९६२ यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठतून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला

८ जानेवारी १९६३ रोजी स्टीफन यांना एक रोग झाला. त्या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) आणि अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅपटर स्क्लोरोसिस (A. L. S) असे म्हणतात. या रोगामुळे शरीरातील सर्व स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. हॉकिंन हे फक्त दोन वर्ष जगतील असे डॉक्टरांनी सांगितले होते. हे कळाल्यानंतर ते खूप निराश झाले होते. पण, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर इतर रूग्णांना आजाराशी लढताना पाहून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी व्हील चेअरचा आधार घेऊन रोगावर मात केली.

‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम’ हा त्यांचा ग्रंथ जगभरात प्रचंड गाजला. येत्या १०० वर्षात पृथ्वी सोडून मानवाला दुसऱ्या ग्राहावर आसरा घ्यावा लागेल, असे भाकित स्टीफन हॉकिंग यांनी गेल्याच वर्षी केले होते. कारण पृथ्वी ही मानवी वास्तव्यास राहणार नसल्यामुळे मानव हे पाऊल उचलणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नाना पटोलेंनी दिली राहुल गांधींना भेट, केली मोठी घोषणा!

News Desk

#CoronaOutbreak | आता घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली

News Desk
देश / विदेश

उत्तरप्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला

News Desk

उत्तर प्रदेश | बहुचर्चित गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. भारतीय जनता पक्षाचा विजयरथ या दोन्ही मतदारसंघात रोखण्यासाठी तब्बल 25 वर्षानंतर बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र आले होते.

11 मार्च रोजी येथे मतदान झाले आणि बुधवारी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच बिहारमधील अररिया येथेही लोकसभेची पोटनिवडणूक झाली. हा मतदारसंघ लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) ताब्यात होता.

तिरंगी लढत

गोरखपूर येथे भाजपने केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला यांचे निकटवर्तीय उपेंद्र दत्त शुक्ला यांना तिकीट दिले होते. तर सपा-बसपा आघाडीने निषाद पार्टीचे अध्यक्ष संजय निषाद यांचे चिरंजीव प्रवीण निषाद यांना रिंगणात उतरवले होते. काँग्रेसच्यावतीने सुरहिता करीम यांना उमेदवारी देण्यात आली होती.

फुलपूरमधून भाजपने वाराणसीचे माजी महापौर कौशलेंद्र सिंह पटेल यांना तिकीट दिले होते. त्यांना समाजवादी पक्षाचे मंडल अध्यक्ष नागेंद्र सिंह पटेल यांनी आव्हान दिले होते. याशिवाय फुलपूरमधून अतिक अहमद हे अपक्ष उमेदवार आहेत. ते फुलपूरमधून सपाचे खासदार होते. यावेळी त्यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली.

Related posts

BCCI ने भारतीय खेळाडुंचे तब्बल १० महिन्यांचे मानधन थकवले

News Desk

आम्हाला भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत | इम्रान खान

Gauri Tilekar

तिहेरी तलाकवरून राज्यसभेत गदारोळ, कामकाज स्थगित

News Desk