HW News Marathi
देश / विदेश

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली | काँग्रेसच्या कार्यकारणीची आज ( १० मे ) दिल्लीत बैठक पार पडली. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. कोरोनाचा संकटकाळ पाहता निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकारणीतील अनेक नेत्यांनी मागणी केल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

काँग्रेसच्या निवडणूक समितीने यापूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या मतदानासाठी २३ जून ही तारीख निश्चित केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने अध्यक्ष पदासाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख ही ७ जून ठेवण्यात यावी अशी सुचना केली होती.

पण, पक्षाची निर्णय घेणारी सर्वोच्च समिती काँग्रेस कार्यकारणीने आजच्या बैठकीत कोरोनाच्या संकटकाळात निवडणूक पुढे ढकलण्यात यावी असे मत मांडले. त्यानंतर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकमताने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद हा वादाचा मुद्दा बनला आहे. पाठोपाठच्या निवडणुकांमध्ये पराभव झालेल्या काँग्रेससाठी यावेळी अध्यक्षपदाची निवडणूक ही गांधी घराण्याची कसोटी पाहणारी ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, आता कायद्यात रुपांतर

News Desk

चीन – भारतातील वाद निवळणार? बैठकीत काय तोडगा निघणार?

News Desk

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द ! मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला वर्ष पूर्ण

News Desk