HW Marathi
देश / विदेश राजकारण

पंतप्रधान गप्प का? ते काय लपवत आहेत?, राहुल गांधींचे पंतप्रधानांना थेट प्रश्न

नवी दिल्ली | भारत-चीनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारले आहेत. राहुल गांधी म्हणाले, “या घटनेवर पंतप्रधान गप्प का आहेत? ते काया लपवत आहेत?, असे ट्वीट केले आहे.

राहुल गांधी म्हणाले,  “या घटनेवर पंतप्रधान गप्प का आहेत? ते काया लपवत आहेत? आता खूप झाले. आम्हाला कळायलाच हवे की नेमके काय घडले?, आपल्या सैनिकांना मारण्याची आणि आपला प्रदेश बळकावण्याची चीनची हिंमत कशी होते?,” असे प्रश्न त्यांनी थेट मोदींना विचारले आहे.

भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात डी एक्स्लेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही ४३ जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत.

 

Related posts

राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो !

News Desk

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार?

News Desk

अर्णब गोस्वामींसाठी राज्यपालांची गृहमंत्र्यांना सूचना, कुटुंबीयांना भेटू देण्याचे दिले निर्देश

News Desk