नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी आज (२६ मे) गुजरातला जाणार आहेत. त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भरुभरुन मते देणाऱ्या वाराणसीच्या जनतेचे आभार मानण्यासाठी उद्या (२७ मे) काशीला जाणार आहेत.नरेंद्र मोदी यांनी या संदर्भातील माहिती त्यांच्या ट्विटरवरुन दिली आहे.
Will be going to Gujarat tomorrow evening, to seek blessings of my Mother. Day after tomorrow morning, I will be in Kashi to thank the people of this great land for reposing their faith in me.
— Narendra Modi (@narendramodi) May 25, 2019
‘आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. त्यानंतर माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी परवा सकाळी काशीला जाणार आहे.’ नरेंद्र मोदी हे (३० मे) रोजी पुन्हा एकदा मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
Exercising powers vested in him under Article 75 (1) of the Constitution of India, President Kovind, today appointed @narendramodi to the office of Prime Minister of India pic.twitter.com/xrs5jgCGkF
— President of India (@rashtrapatibhvn) May 25, 2019
नरेंद्र मोदी यांची एनडीए संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींनी आपली पंतप्रधान पदी नियुक्ती केल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राष्ट्रपतींनी मोदींना मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांची नावे आणि राष्ट्रपती भवनातील शपथविधीची तारीख आणि वेळ कळवायला सांगितली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.