HW News Marathi
देश / विदेश

कोरोनासोबतच दिल्लीकर भुकंपाच्या धक्क्याने धास्तावले

नवी दिल्ली | कोरोनाच्या धक्कयाने संपूर्ण देश हादरला आहेच. पण, दिल्लीत एकाच दिवशी सलग दुसऱ्यांदा भूकंपाने हादरा दिला आहे. या भूकंपाची तीव्रता २.७ रिश्टर स्केल इतकी होती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (१३ एप्रिल) दुपारी १.२६ ला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीमध्येच होता. दरम्यान, या झटक्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु, कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच भूकंपाच्या दुसऱ्या धक्क्याने नागरिकांमधील भीतीत भर पडली आहे.

तर, काल (१२ एप्रिल) दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. संध्याकाळी ५.४५ वाजता ३.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. हा झटका इतका तीव्र होता की नागरिकांनी घाबरून आपल्या घराच्या बाहेर धाव घेतली होती. कोरोनातुन मुक्तता होत नाही आहे तर आणखी एक धक्का दिल्लीकरांना बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याच्या हाय एक्सप्लोझीव्ह कारखान्यात वायू गळती

News Desk

संजय राऊत दिल्लीत, भाजप नेत्यांची भेट घेणार?

News Desk

लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली ! – जयंत पाटील

News Desk