HW News Marathi
देश / विदेश

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलेला मिळणार पोटगी

मुंबई | लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलांनाही आता आपल्या जोडीदाराकडे पोटगी मागता येणार आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलादेखील ओता पोटगी मागू शकतील. जोडीदाराने शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक असा कुठलाही छळ केल्यास घरगुती हिंसाचार कायदयाअंतर्गत विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

एका महिलेने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना मुलाला जन्म दिला. तिला पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले. या आदेशाविरोधात तीच्या जोडीदाराने झारखंड उच्च न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने केवळ विवाह झालेल्या महिलांनाच पोटगी मिळण्याचा अधिकार असल्याचा आदेश दिला होता. या महिलेने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आदेश देत महिलेचा विवाह झाला नसला, तरी घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तिला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. घरगुती हिंसाचारामध्ये आर्थिक प्रकरणांचाही समावेश आहे. असे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्विटरकडून ‘ती’ चूक दुरुस्त! उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या अकाऊंटला पुन्हा ‘ब्लू टिक’

News Desk

#VizagGasTragedy | विशाखापट्टणममध्ये वायुगळतीमुळे ९ जणांचा मृत्यू, ३०० जण रुग्णालयात दाखल

News Desk

1 एप्रिल म्हणजे मोदींचा वाढदिवस; राष्ट्रवादीकडून अनोखा वाढदिवस साजरा!

News Desk