HW News Marathi
Covid-19

कोरोनाची लस ‘या’ देशात चाचणीसाठी झाली तयार

लंडन | ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हसिटीमध्ये कोरोनाची लस तयार झाली असून तिची चाचणी करण्याची तयारी सुरु आहे. लंडनचे आरोग्यमंत्री मैट हैनकॉक यांनी काल (२१ एप्रिल) सांगितले की, २३ एप्रिलला या लसीचा प्रयोग वॉलेंटियर्सवर करण्यात येणार आहे. तसेच, हैनकॉक यांनी सांगितल्यानुसार तेथील सरकार आणि आरोग्य यंत्रणा ही लस तयार करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लस बनवण्याच्या यादीत ब्रिटन सगळ्यात अग्रेसर आहे.

सद्यस्थितीला ब्रिटनमध्ये २ लसी तयार करण्यात येत आहेत. एक ऑक्सफर्डला आणि दुसरी इंपीरियल कॉलेजमध्ये तयार करम्याचे काम सुरु आहे. साधारणपणे ही लस तयार करण्यात अनेक वर्ष लागतात. मात्र, आम्ही हे काम करुन दाखवले आहे, त्याचा मला गर्व आहे, असेही हैनकॉक यांनी सांगितले.

दरम्यान, ही लस तयार करण्यासाठी या दोनही युनिव्हसिटीला क्लिनीकल ट्रायल फंड देण्यात आला आहे. ४४.५ मिलियन पाऊंड इतकी रक्कम देण्यात आली आहे. तसेच, जर ही लस यशस्वी झाली तर आणखी आर्थिक मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘म्युकर मायकॉसीस’च्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार | राजेश टोपे

News Desk

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या प्रयोगशाळेच्या उद्घाटनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण  

News Desk

कोरोनाचे आज १६०६ नवीन रुग्ण, राज्यात एकूण रुग्ण ३० हजार ७०६ वर

News Desk