HW Marathi
देश / विदेश

टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकची २२ एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी

नवी दिल्ली | टेरर फंडिंग प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला आज (१० एप्रिल) अटक करण्यात आली आहे. यासिन मलिकला एनआयएच्या विशेष न्यायलयासमोर हजर करण्यात आले असून त्याची २२ एप्रिलपर्यंतच्या कठड पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्थेत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे.

मलिकच्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटवर (जेकेएलएफ) केंद्र सरकारने गेल्या महिन्यात बंदी घातली आहे. त्याच्यावर सीबीआयने दोन खटले दाखल केले आहेत. यानंतर मलिका यांना चौकशीसाठी एनआयएच्या विशेष न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर दिल्लीत आण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरच्या दहशतवादाला खतपाणी घालून प्रोत्साहन देणाऱ्या उद्योगही यासिनच्या संघटनेकडून करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैय्या सईद यांचे अपहरण करणे आणि भारतीय हवाई दलाच्या ४ कर्मचाऱ्यांची हत्या केल्याचा मलिकवर आरोप आहे.

Related posts

#PulwamaAttack : पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली

News Desk

सर्वोच्च न्यायालयाकडून श्रीसंतला मोठा दिलासा, आजीवन बंदी उठविली

News Desk

तामिळनाडूत ‘गाजा’ चक्रीवादळाचा धोका, ७६ हजार लोकांचे स्थलांतर

News Desk