HW Marathi
देश / विदेश

येडीयुराप्पा यांनी भाजपच्या जेष्ठ नेत्यांना दिली हजारो कोटींची लाच

नवी दिल्ली | कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते बी.एस. येडीयुराप्पा यांनी भाजपच्या जेष्ठ नेत्यांना हजारो कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. येडीयुराप्पाची ही डायरी २०१७ पासून आयकर विभागाच्या ताब्यात आहे. तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर अद्याप कारवाई का? केली नाही, असा सवाल सुरजेवाला यांनी उपस्थित करत मोदींवर निशाना साधला आहे. काँग्रेसची आज (२२ मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला आहे.

येडीयुराप्पा २०११ मध्ये खनिज घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर २४ दिवसांत त्यांची सुटका झाली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या घोटाळ्याचे चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने या प्रकरणात छापे टाकले होते. त्यादरम्यान येडीयुराप्पांची डायरी जप्त करण्यात आली होती. या डायरीमध्ये  केंद्रातील मोठ्या नेत्यांना तब्बल १८०० कोटी रुपये लाच दिल्याचा उल्लेख केला आहे.

सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत या डायरीचे झेरॉक्स माध्यमांना दाखविले. या पानावर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि राजनाथ सिंह यांच्या नावाचा उल्लेख आहे. या पानावर सीबीआयने येडीयुराप्पांची सहीही घेतलेली दिसत आहे. यावरून सुरजेवाला यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असून येडीयुराप्पा मुख्यमंत्री असताना भाजपाच्या मोठ्या नेत्यांना हजारो कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र, सत्तेत येताच भाजपने आणि मोदी यांनी ही चौकशी थांबविल्याच्या आरोप केला आहे.

Related posts

‘फरार’ विजय माल्ल्या

News Desk

सलग नवव्या दिवशी पेट्रोल २५ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar

ओडीसा, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

News Desk