HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकात आज येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करावे लागणार

बंगळुरु । कर्नाटकातील नागरिकांना आज नवीन सरकार मिळणार आहे. काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळून भाजपच्या बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. शपथ घेतल्यानंतर आज (२९ जुलै) येडियुरप्पा बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सभापती केआर रमेशकुमार यांनी काल (२८ जुलै) काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांना अपात्र घोषित केले आहे. यानंतर कर्नाटकातील विधानसभेतील संख्याबळ आता २०७ पर्यंत येऊन पोहोचले आहे. भाजपचे १०५ आमदार आहेत. त्यामुळे त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १०४ आमदारांची गरज आहे.

अपात्र घोषित केलेल्या १७ आमदारांमध्ये १४ काँग्रेस, जेडीएसचे ३ आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे. सभापतींनी दिलेल्या झटक्याने अपात्र आमदार २०२३ पर्यंत पोटनिवडणूकही लढू शकणार नाहीत. त्यामुळे अपात्र आमदारांची अवस्था बिकट झाली आहे. भाजपकडून त्यांना बरीच प्रलोभने दाखवण्यात आली होती, पण आता सभापतींनी केलेल्या खेळीने त्यांना आता दूरच रहावे लागणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंगारात सापडलेल्या नाण्याची किंमत दीड कोटी

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ६ वाजता देशवासियांना संबोधित करणार!

News Desk

इस्रायल-पॅलेस्टाईन वाद भडकला, हमासच्या हल्ल्याला इस्रायलचं जशास-तसं उत्तर

News Desk