HW News Marathi
देश / विदेश

योग सर्वांचा आहे, सर्वजण योगाचे आहेत !

नवी दिल्ली | “समाजातील गरिबातील गरीब व्यक्तीपर्यंत योग पोहचला तर ते कोणत्याही आजारापासून दूर राहतील. निरोगी जीवनासाठी केवळ औषधे आणि शस्त्रक्रिया पुरेशा नाहीत. म्हणूनच आम्ही योगाभ्यासाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य कसे सुधारता येईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. योग सर्वांचा आहे आणि सर्व जण योगाचे आहेत”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनातील योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने रांची येथे आज (२१ जून) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांनी उपस्थिती लावत योगाभ्यास केला. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.

“आपण आयुष्यभर योगाचे पालन केले पाहिजे. योग कधीही माणसाचे वय, रंग, जात-पात, धर्म-पंथ, श्रीमंत-गरीब, देश-प्रांत बघत नाही. माणसांमध्ये भेदभाव करत नाही. योग हा सर्वांचा आहे आणि सर्वजण योगाचे आहेत”, असे मोदी यावेळी म्हणाले. रांची येथील प्रभात तारा मैदानात आज पंतप्रधान मोदींनी तब्बल ४० हजारहूनही अधिक लोकांच्या योगाभ्यास केला. “योगाभ्यासामार्फत लोकांचे आरोग्य कसे सुधारता येईल यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे”, असेही मोदी यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे भाजपची नाव न घेता तक्रार

News Desk

एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या

News Desk

माझ्या ‘फडणवीस’ असण्यामुळे शरद पवारांनीही भूमिका बदलल्या !

News Desk