HW News Marathi
देश / विदेश

ज्यांना विकास आवडत नाहीत ते जातीय दंगली घडवण्याची संधी शोधतायत, योगींचा विरोधकांना पलटवार

पाटणा | उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील १९ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षाची योगी सरकारवर टीकेची झोड सुरुच आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांना विकास आवडत नाही, ते जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत असे ट्विट त्यांनी केले आहे.

“ज्यांना विकास आवडत नाही ते लोक देशात व प्रदेशात जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत. या दंगलीच्या आड विकास थांबेल व त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याची संधी मिळेल. यासाठीच नवनवीन षडयंत्रे रचली जात आहेत. मात्र आम्हाला ही सर्व षडयंत्रे ओळखून विकासाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे”, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत बंदनंतर सुद्धा पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ कायम

swarit

चंद्रापासून २.१ किलोमीटरवर ‘विक्रम’शी संपर्क तुटला

News Desk

संजय राऊतांच्या दिल्लीतील घरी रंगलेल्या मैफिलीचे खास फोटो ,भाजपचे खासदारही उपस्थित…

News Desk