HW News Marathi
देश / विदेश

कुठल्याही क्षणी शशिकला यांना अटक होणार

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्री पदाचा दावा करणार्‍या शशिकला नटराजन यांना मोठा झटका दिला आहे. 21 वर्षे जुन्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी (डिसप्रपोर्शनेट अॅसेट-DA) दोषी ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक हायकोर्टाचा निकाल फेटाळून ट्रायल कोर्टाने ‍सुनावलेली 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. परिणामी, शशिकला यांना ट्रायल कोर्टाला शरण जावे लागणार आहे. तेथून त्यांची रवानगी थेट तुरुंगात होईल. शशिकला यांना साडे तीन वर्षे तुरूंगात राहावे लागेल. यापूर्वी त्यांनी 6 महिन्यांची शिक्षा भोगली आहे.

आतापर्यंतचे अपडेटस्

– काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्व्हम पोलिसांसोबत रिसॉर्टमध्ये पोहोचले आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अन्नाद्रमुकचे खासदार ए नवानीथाकृष्नन यांनी म्हटले आहे.

-आम्ही फेरविचार याचिका दाखल करणार आहे. विधिमंडळनेतेपदी ए.पलनीस्वामी यांची निवड झाली आहे. पन्नीरसेल्व्हम आता अन्नाद्रमुकचे सदस्य नसल्याची एम. थंबीदुराई यांनी म्हटले आहे.

-ईके पलानीस्वामी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्‍यात आली आहे. आमदारांचा पलानीस्वामी यांना पाठिंबा असल्याचे पत्र राज्यपालांना पाठवण्यात आल्याचे अन्नाद्रमुक पक्षाने सांगितले आहे.

-सर्व आमदारांनी माझी विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. आमदारांच्या समर्थन पत्र प्राप्त झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेणार असल्याचे ईके पलानीस्वामी यांनी सांगितले आहे.

-राज्यपालांनी राज्यात लवकरच स्थायी समिती स्थापन करावी, अशी विनंती डीएमकेचे नेते एम के स्टालिन यांनी केली आहे.

-21 वर्षांनी का होईना न्याय मिळाला. भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी नेत्यांसमोर एक उदाहरण असल्याचे डीएमकेचे नेते एम के स्टालिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

– पनीरसेल्वम यांचे पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे अण्णाद्रमुकच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवर म्हटले आहे.

-ए.पलनीस्वामी सध्याच्या सरकारमध्ये बांधकाममंत्री आहेत. शशिकलांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक आहेत.

-AIADMK चे ज्येष्ठ नेते ए.पलनीस्वामी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड

– ओ. पनीरसेल्वम यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

-रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या बैठकीला दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा भाचा दीपक जयकुमार उपस्थित

-तुरुंगात जाण्यापूर्वी शशिकला यांनी बोलावली आमदारांची बैठक, पोलिसांनी रिसॉर्टला घातला घेराव

-पन्नीरसेल्व्हम समर्थकांनी ढोल ताशे आणि फटाखे वाजवून जल्लोष केला.

-शशिकला निकटवर्तीयांपैकी एकाला घोषित करू शकते विधिमंडळाचा नेता. रिसॉर्टमध्ये बैठक सुरु

-चेन्नई: पन्नीरसेल्व्हम यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांचा जल्लोष

-गोल्डन बे रिसॉर्टमध्ये शशिकलांचे बंधु दिवाकरन आणि भाचा टीटीव्ही दिनकरभ उपस्थित

– 2 पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नेतृत्त्वात राज्य परिवहन मंडळाच्या चार बस कोवाथुर येथील गोल्डन बे रिसॉर्टमध्ये पोहोचल्या.

-अम्मांनाही संकटांचा सामना करावा लागला होता. मलाही संकटांना सामोरे जायचे आहे. अखेर धर्माचा विजय होईल, मला विश्वास आहे- शशिकला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय वायु सेनेचा पोखरणमध्ये युद्धसराव

News Desk

नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात; युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू

Aprna

कपिल शर्मा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

News Desk